भूम  शहरातील गोलाई चौक येथे दोन महापुरुषांचे पुतळे उभारणीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री ही घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे भूम शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने हालचाल करत कडक बंदोबस्त तैनात केला आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौक परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परंडा, अंबी आणि धाराशिव येथूनही अतिरिक्त पोलीस पथके बोलावण्यात आली आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून बैठकींचे सत्र सुरू असून सायंकाळपर्यंत चर्चा सुरू होती. शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पक्षांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या गोलाई चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 
Top