वाशी (प्रतिनिधी)- वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील देवांश प्रमोद शिंदे याने 216 गुण व रुद्र वाघेश स्वामी याने 181 गुण मिळवत सैनिक स्कूल प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. 

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेतील या यशाबद्दल या दोन्हीही विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास थोरबोले व पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शालेय समितीचे चेअरमन तानाजी शिनगारे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप कवडे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नेताजी नलवडे,विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


 
Top