मुरूम (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (ता. 8) रोजी मुरूम नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शहर स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या दुर्लक्षित व वंचित महिलांना साडी-चोळी देऊन त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिल्पा डागा होत्या. यावेळी डॉ. सुवर्णा पाटील, उमरगा सेंटरच्या शिल्पा क्षीरसागर, मुरूम सेंटर च्या अनिता मिरकले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कष्टाने आणि जिद्दीने मुलांना घडविणाऱ्या कर्तबगार मातांपैकी आई सुमन शिंदे व वडील लक्ष्मण शिंदे पाटील यांचा मुलगा बलराज शिंदे पाटील यांनी सी. ए. उत्तीर्ण, गिरीजा कांबळे, सुनिता क्षीरसागर, चिंताबाई कांबळे, सुक्षाबाई भालेराव, शिवगंगा कांबळे, ज्योती हावळे, नंदाबाई कांबळे, मनीषा वाघमारे, नंदिनी कांबळे, कल्याणताई कांबळे, शांता कांबळे, वैशाली सोनकांबळे, अनिता कांबळे, लिंबाबाई कांबळे आदी सफाई कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुनिल राठोड, कल्लाय्या स्वामी, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश मोटे, प्रा. भूषण पाताळे, वैष्णवी सूर्यवंशी, श्रुती नागदे आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष कांबळे तर आभार सचिव कल्लाप्पा पाटील यांनी मानले. या समाजपयोगी उपक्रमाबद्दल सफाई महिला कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रोटरीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
