ढोकी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने बुधवार तारीख 18 रोजीढोकीत जिल्हा परिषद कन्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान आयोजित शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे माननीय अप्पर आयुक्त व इतर मान्यवरांच्या वतीने पूजन करून सुरुवातीस प्रार्थना घेण्यात येऊन शिबिरास प्रारंभ करण्यात आला अपर विभागीय उपायुक्त श्रीमती मंजुषा मिस्कर यांनी सांगितले की “आपण कार्य करत असताना चांगल्या वाईट अनुभवाचा ठेवा समोर ठेवून त्यात अनुभव घेऊन वाटचाल केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम तयार होतात व याचा सर्व स्तरावर सकारात्मक परिणाम होतो या दृष्टीने प्रशासनाने वाटचाल केल्यास त्यातून निश्चित चांगले काही घडू शकते“

धाराशिव तहसीलदार डॉक्टर श्रीमती मृणाल जाधव म्हणाल्या की “शासनाच्या धोरणानुसार विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी न जाता जाग्यावर प्रशासन येऊन त्यांना लाभ मिळावा हा स्पष्ट हेतू या अभियानाचा असून याचा सर्वांनी फायदा घेण्याचे आव्हान केले“ आजच्या अभियानात जात प्रमाणपत्र ,रहिवाशी उत्पन्न नॉन क्रिमिनल ,नॅशनॅलिटी अल्पभूधारक ,भूमिहीन, ऍग्रो स्टॅग, किसान कार्ड, एस टी महामंडळ स्मार्ट कार्ड आरोग्य विभाग आदी  विभागातील1112 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला तर विविध योजना अंतर्गत 290 अर्ज प्राप्त झाले या शिबिरात आरोग्य विभागाच्या वतीने 37 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली  विविध स्टॉल लावण्यात आले होते बचत गट ,आशा कार्यकर्ती च्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते या स्टॉलला उपायुक्त श्रीमती मिस कर यांनी भेट देऊन त्यांच्याशी व विविध लाभ योजना अंतर्गत  लाभार्थ्यांची संवाद साधून जागेवर निपटारा करण्याचा प्रयत्न केला या शिबिरात ढोकी ,पळसप, येडशी मंडळातील  तलाठी, गिरदावर शासनाच्या विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य तीर्थराज घाडगे, अजित लाकाळ पंचायत समिती सदस्य शामल पाटील, अमर समुद्रे ,सुशील काकडे, जगन्नाथ विभुते ,ढोकीच्या सरपंच आश्विनी माळी, पळसप चे सरपंच सिद्धेश्वर काळे, गोवर्धनवाडीच्या सरपंच निलावती लोमटे ढोकीचे उपसरपंच अमोल पापा समुद्रे , नायब तहसीलदार महादेव शिंदे, विशाखा बलकवडे, घृष्णेश्वर स्वामी शासनाच्या विविध योजनाचे कर्मचारी, अधिकारी, भाजपाचे निहाल काजी ,माजी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, पांडुरंग वाकुरे ,तिन्ही मंडळातील पोलीस पाटील ,विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते शिबिराची जय्यत तयारी ढोकी मंडळ अधिकारी संभाजी तोगरे तलाठी वेंकटेश लोमटे व त्यांच्या सर्व टीमने केली.

 
Top