तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत बाळु मामा भंडारा उत्सव साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने श्री संत बाळु मामा यांच्या प्रतिमेची पालखीतून मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. हभप श्रावणीताई तौर यांचे किर्तन संपन्न झाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
