भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरम, व्हॉइस चेअरमन व सचिव पदाची निवड करण्यात आली.

संस्थेचे नूतन चेअरमन म्हणून अंगद मिसाळ, व्हाईस चेअरमन म्हणून गोकुळ आरेकर तर सचिवपदी दत्तात्रय घुले यांच्या निवडीची घोषणा राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष सन्माननीय बाळकृष्ण तांबारे यांनी केली.

नूतन पदाधिकारी निवड प्रसंगी राज्य संघाचे चिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बारकुल, कळंब तालुका संघाचे माजी अध्यक्ष दत्ता पवार, जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे, भूम तालुका संघाचे अध्यक्ष संजीवन तांबे यांची भाषणे झाली. तालुका संघाचे सरचिटणीस दत्तात्रय गुंजाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्यासंख्येने शिक्षक संघाचे कार्यकर्ते व पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते.

याप्रसंगी हरी पवार, सुनील गुंजाळ, शहाजी जाधव, रणजीत सोन्ने, श्रीपाद कुंभार, तात्या ढोरे, शेख, किशोर बुरंगे, अच्युत मुळे, भाऊसाहेब कोळेकर, शहाजी पंडित, अण्णा मोटे, सुभाष शिंदे, उत्तरेश्वर पायघन, रामभाऊ शिंदे, हरिभाऊ साळुंखे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक वाळके यांचे सह तालुका संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.


 
Top