धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. धाराशिव शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा या स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, या जागेसाठी द्यावे लागणारे सुमारे 2 कोटी 8 लाख रुपयांचे मूल्य शासनाने माफ करावे यासाठी आ राणाजगजितसिंह पाटील यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून अतिशय महत्त्वाची निभावत यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते दत्ता पेठे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आभार मानले आहेत.

 
Top