धाराशिव (प्रतिनिधी)- घरात आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही वडिलांच्या स्वप्नांना आकार देणारे पुत्र म्हणजे राम गरड. शेतमजुरी करून आपल्या मुलाला अभियांत्रिकीचे शिक्षण द्यावे, हे वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाची निवड केली.
या निवडीनेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. मेकॅनिकल विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि प्रोत्साहनामुळेच आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवू शकल्याचे राम गरड यांनी सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी राम गरड यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तेरणा महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील आहे. महाविद्यालयाचे अकॅडमीक डीन व मेकॅनिकल इंजीनियरिंगचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. दाते म्हणाले, मेकॅनिकल विभाग नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व नागरी सेवेच्या तयारीसाठी सज्ज असतो. रामचे यश हे विभागाच्या या धोरणाचे प्रतीक आहे.
राम यांनी यावेळी आपल्या यशाचे श्रेय मेकॅनिकल विभागातील प्रा. आर. एम. शेख यांच्या विशेष मार्गदर्शनाला दिले. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, मित्राचे उपाध्यक्ष संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी रामचे अभिनंदन केले.
