धाराशिव (प्रतिनिधी)- आखिल भारतीय शिक्षक संघाच्या वतीने,धाराशिव जि. प. च्या नूतन अध्यक्षा आदरणीय अर्चनाताई पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली
प्रमुख मागण्या
सहशिक्षण च्या नावाखाली बंद करण्यात येत असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत.
गणवेश आणि बूट सॉक्स चे पैसे शाळा सुरु होण्यापूर्वी देण्यात यावेत.
पदवीधर स्वेच्छेने पदावनत करण्याची प्रक्रिया लवकर राबवावी.
पदोन्नती( प्रमोशन) करताना सेवाज्येष्ठ शिक्षकांना अगोदर संधी द्यावी.
विज्ञान पदवीधर शिक्षकापैकी पदवी प्राप्त नसलेले शिक्षक पदावनत करावेत.
शाळेची वेळ सकाळी साडे सात ते साडे अकरा करावी,अशा विविध मागण्या अध्यक्ष बशीरभाई तांबोळी,यांनी सविस्तर मांडल्या.
यावर सगळ्या मागण्याचा लवकर विचार करून,यावर निर्णय घेऊ असे आश्वासन संघाच्या शिष्टमंडळाला दिले. विद्यार्थी हित लक्षात घेता अर्ध वेळ शाळेची वेळ सकाळी 7.30 ते 11.45 करण्यास मान्यता देण्यात आली सदर पत्र उद्या निर्गमित होईल तसेच मा. शिक्षण अधिकारी डॉ. श्री. रवींद्र खंदारे याची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर,जिल्हा अध्यक्ष बशीर तांबोळी, कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे,सरचिटणीस अविनाश मोकशे,राज्य कार्यकारिणी सद्स्य सविताताई पांढरे,जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी साखरे,नप जिल्हा अध्यक्ष पवार सर,महिला आघाडी प्रमुख,अनिषा ताई कदम,जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष सचिन भांडे सर,शाहू पतसंस्था चेअरमन सुरेश भालेराव,कळंब तालुका अध्यक्ष महेंद्र रणदिवे मिलिंद धावारे,केंद्रप्रमुख जगदीश जाकते, तानाजी व्हनकळस, नप प्रमुख श्री पवार, इस्माईल शेख, हाशम शेख,जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील सर, जिल्हा उपाध्यक्ष
बब्रुवाहन भोसले,श्रीमती तबसूम बागवान,भोसले सर,धाराशिव तालुका अध्यक्ष नागनाथ मुडबे
वाशी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने,भूम तालुकाध्यक्ष युवराज पिंगळे, लोहारा तालुकाध्यक्ष श्री घोडके, श्री चंदनशिवे दाजी,रणदिवे सर,दिपक ठोंबरे सर,मारुती काळे ,इलाही बागवान,मोहन नागटिळक,दिनेश पेठे,हनुमंत माने सर,लक्ष्मण घोडके,महेश अनपट,भालेराव सर, मोहन लष्करे,तुळजापूर तालुका अध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, शेखू जेटीथोर, दयानंद जेटीथोर,विठ्ठल जेटीथोर, बिलाल सौदागर, सुरेश चांदणे, गोरख खरताडे, यशवंत भांबुरे, बाळासाहेब घेवारे, विठ्ठल भोसले, दत्तात्रय लोहार, गोविंद बाचेवाद , शिवलिंग हंकारे, ज्ञानेश्वर ढोले, श्री मलंग सर, लक्ष्मण घोडके, श्रीहरी बिडवे,शिवाजी निंबाळकर, सुधीर पवार आणि जिल्हाभरातून आलेले शेकडो शिक्षक उपस्थित होते.
