धाराशिव (प्रतिनिधी)- मागच्या वेळी याच सरकारने दिलेली कर्जमाफीचा कसा अनुभव आला हे सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे आताही अटी निकष पूर्ण करण्यात यानी पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवू नये असे म्हणत जोवर कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही तोवर या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

यावेळी आमदार पाटील म्हणाले की, शेतकरी अनुदान योजना पाहता तिथं अनुदान दिले जात नाही. त्यामुळे कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये शेती उत्पन्न घटल्याच दिसून येत आहे. याच गतिमान सरकारने केलेली ही कामगिरी आहे. कोविड काळात जे क्षेत्र संजीवनी ठरलं त्याची पुढच्या काही सालात सरकारचे शेतकरी विरोधी धोरण कस मारक ठरलं. शिवाय या सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेण्याची तयारी केली असताना मार्च 2025 मध्ये कर्जवसुलीची सक्ती का केली जे शेतकरी चालू बाकीमध्ये गेले त्यांची या सरकारने फसवणूक केली नाही का असा प्रश्न आमदार पाटील यांनी सरकारला विचारला आहे. 

मोठ्या उद्योगपतीसाठी ज्या प्रकारे गालिचा अंथरलेला असतो तसा विचार शेतकरी, बेरोजगार, महिला यांच्या बाबत का होत नाही. लाडकी बहिण योजना मधून 2100 रुपये देणं, भावांतर योजना, जीएसटीतून राज्य सरकारची करमाफीच आश्वासन दिलं त्यावर सरकार बोलत नाही. पण ज्या शक्तीपीठ महामार्ग यास विरोध असतानाही तो पूर्ण करण्यासाठी सरकार साम,दाम,दंड,भेद याचा वापर करत आहे यावरून सरकारची निती लक्षात येते अस मत आमदार पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

 
Top