तुळजापूर (प्रतिनिधी)- बालाजी अमाईन्स लि. तामलवाडी या कंपनीच्या आर्थिक सहाय्याने, एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटल (संचलित शंकरशेठ साबळे नेत्र रूग्णालय) व रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू नागरीकांकरीता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दि.27 मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतिबिंन्दू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे शिवरत्न नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बालाजी अमाईन्स लि. यांच्या अर्थिक सहाय्याने शंकरसेठ साबळे आय हॉस्पीटल संचलित एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटल सोलापूर व रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

40 वर्षापुढील व्यक्तींची होणार मोफत तपासणी व मिळणार मोफत चष्मा, या शिबीरामध्ये 40 वर्षापुढील वयोगटातील व्यक्तीची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून जवळच्या नंबरचा चष्मा मोफत देण्यात येईल व मोतीबीन्दू असलेल्या व्यक्तींची मोफत शस्त्रकिया करण्यात येईल. शस्त्रक्रिया करण्यात येणार्या रूग्णांची राहण्याची, जेवणाची व ने - आण करण्याची मोफत व्यवस्था  डोळ्यावर शस्त्रकिया करण्यात येणा-या रुग्णांची जेवणाची व राहण्याची मोफत सोय करण्यात येईल शस्त्रकिया करण्याकरिता रुग्णांना मोफत ने- आण करण्याची सुविधाही देण्यात येईल. रुग्णांनी शिबिरास येताना व शस्त्रक्रीयेस येताना “ आधारकार्ड झेरॉक्स “ व “ रेशन कार्ड  झेरॉक्स “ सोबत आणणे आवश्यक आहे. असे संयोजकांच्या वतीने काळविण्यात आले आहे.

 
Top