उमरगा (प्रतिनिधी)- देशातील अग्रगण्य व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नवभारत टाईम्स, दिल्ली या वृत्तसंस्थेतर्फे दिला जाणारा “उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार”आपल्या उमरगा येथील “श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ” या संस्थेला आज छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे प्रदान करण्यात आला.

हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री अतुल सावे व आमदार  विक्रम काळे यांच्या हस्ते श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर यांना भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी आदर्श वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्री. राम सोलनकर, श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य राम पेठकर व तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

10 सप्टेंबर 1984 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने अत्यंत उल्लेखनीय व गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तबझाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील व सरचिटणीस, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी प्राचार्य तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

 
Top