धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अंतर्गमत असलेल्या प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा घेवून पुढील नियोजन करण्यात येईल. लोकाभिमुख्य प्रशासन, तसेच शिक्षण व आरोग्य सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करण्यासाठी भर देण्यात येईल. अशी माहिती नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची सांगली जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. यामुळे त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी नवीन सीईओ म्हणून महाडदळकर यांनी पदभार स्विकारला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष उषा गायकवाड यांच्यासह सर्व सभापती व जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांची भेट घेवून स्वागत केले. यावेंळी बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक विभागाचा आढावा घेवून काम केले जाणार आहे. सद्यस्थितीत विविध योजना कोणत्या स्थितीत आहेत आणि त्या पूर्णा करण्यासाठी काय करावे लागेल, या संदर्भात मायक्रो प्लॅनिंग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जि. प. सीईओ महाडदळकर यांनी आयएशसच्या प्रशिक्षणार्थी म्हणून उमरगा, तुळजापूर व धाराशिव येथे काम केल्यामुळे त्यांना जिल्ह्याची बऱ्यापैकी माहिती आहे.
