तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञास 29 मार्च पासून प्रारंभ झाला. यज्ञ पहाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.

भीष्म फाउंडेशन स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्ऊ,पुणे विश्व मंदिर परिषद, भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण विश्वाचे कल्याण, दैवी ऊर्जेची अनुभूती,त्रुतू चक्रांचे संतुलन,पंच महाभूतांचे संतुलन, पर्यावरण आणि वायुमंडलाचे शुद्धीकरण, वैयक्तिक आरोग्य प्राप्ती, आभा(ऑरा), पंचकोशीय शुद्धी, भूमी-जल पोषण सुधार आणि शुद्धीकरण यासाठी अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचा प्रारंभ धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहा काकडे व राहुल काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, जिल्हा परिषद सदस्य संजय लोखंडे, येडशीचे माजी सरपंच गजानन नलावडे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

 
Top