धाराशिव  (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सारोळा (बुद्रुक) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव २५ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांचे चरित्र, महाराष्ट्राची कला परंपरा आणि भारताच्या सांस्कृतिक वारशावर आधारित विविध नाट्यकला, नृत्य आणि सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.

या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेल्या कला, अभिनय आणि नृत्य कौशल्याला व्यासपीठ मिळाले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना पालक आणि प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, प्रेक्षक व पालकांकडून जवळपास ४० हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. नवोदय स्कॉलरशिप, रायगडवीर, कब-बुलबुल यांसारख्या उपक्रमांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून विशाल सूर्यवंशी यांनी जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन राजेंद्र अंगरके आणि सुमित्रा आटपलकर यांनी प्रभावीपणे केले.

यावेळी श्रीमती गोकर्णताई कदम, प्रमोद पाटील, प्रशांत तात्या रणदिवे, निर्मलाताई चंदने, वैभव पाटील, नामदेव आप्पा खरे, बालाजी मसे, सचिन जासूद, आरटीओ कुदळे, दत्ता कुंभार, तानाजी वनकळस, संजय आबा पवार, राकेश कटारे, सुनिता वडगावकर, अनिता सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, शेषणी, नानासाहेब सावंत, बाळासाहेब कटारे, प्रवीण वाघमारे, उर्मिला देवगिरे आदी मान्यवर उपस्थित होते

 
Top