तुळजापूर (प्रतिनिधी)-  शिवजन्मोत्सवानिमित्त शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाडा केसरी तुळजा भवानी चषक भव्य बैलगाडा शर्यतीचे  रविवार दि. 22 मार्च 2026 रोजी धाराशिव रोडवरील बोरी (ता. तुळजापूर) येथे भारत आडेकर यांच्या शेतात  आयोजीत केली आहे मराठवाड्यातील पहिली बैलगाडा शर्यत घेणारे शिवबा राजे प्रतिष्ठान वतीने यंदा पाचव्या वर्षीही या स्पर्धा आयोजित केले आहेत. 

या बैलगाडा शर्यतीसाठी मराठवाड्यातील बैलगाडा शौकिनांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून शेकडो गाड्या सहभागी होण्याची शक्यता आहे. विजेत्या बैलगाड्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणाही आयोजकांनी केली आहे. या स्पर्धेत रोख रकमेचे पारितोषिक आमदार कैलास पाटील यांच्या वतीने ठेवण्यात आलेले आहेत. तर युवा नेते बालाजी तट  यांच्या वतीने मानाचा गदा बक्षीस देण्यात येणार आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांकास 51 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 31 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 21 हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास 11 हजार रुपये, पाचवा क्रमांक 7 हजार व सहावा क्रमांक 5 हजार रुपये असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गट पास होणाऱ्या गाडीस ढाल देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत प्रत्येक विजेत्यास मानाची गदा देण्यात येणार असून युवा नेते श्री. बालाजी (भैय्या) गट यांच्या वतीने ती प्रदान केली जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान लाईव शो देखील आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी नगरसेवक रणजीत इंगळे नगरसेवक किरण कदम चिवचिवेवे प्रशांत अपराध पवनराजे कदम  महेश गवळी ओंकार काळे चंद्रकांत नाईक गोपाळ पवार यांचेअर्थसहाय असणार आहे. या भव्य शर्यतीसाठी परिसरातील बैलगाडा प्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अर्जुन साळुंखे, नितीन जट्टे, विकी वाघमारे, दीपक  निकम, सुमित छत्रे, सागर मस्के आयोजकांकडून करण्यात आले आहे.


 
Top