धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने टाटा मोटर्स कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
सदर परिसर मुलाखतीसाठी 154 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. त्यामध्ये 31 विद्यार्थी मुलाखतीसाठी हजर होते. यापैकी 28 विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड करण्यात आल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ. मारुती लोंढे यांनी दिली. सदर मुलाखतीसाठी टाटा मोटर्स कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सोमेश्वर सोनवणे आणि एच आर एक्झिक्यूटिव्ह प्रकाश हाळवे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना कंपनी विषयी माहिती देण्यात आली व त्यानंतर त्यांच्या मुलाखती घेऊन निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी केले, सूत्रसंचालन कवी प्रा. डॉ. अरविंद हंगरेकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कुणाल वणंजे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रो .डॉ. छाया दापके या होत्या.तर प्रमुख उपस्थितीत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.मंगेश भोसले हे होते. सदर कार्यक्रमासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर निवडीबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी यशस्वी उमेदवारांचे व प्लेसमेंट विभागाचे अभिनंदन केले आहे.
