तुळजापूर (प्रतिनिधी)- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत भव्य वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दि. 23 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे पार पडणार आहे.
या शिबिरात नागरिकांसाठी विविध आजारांवर मोफत तपासणी, निदान व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया, फुफ्फुसांचे आजार व मशीनद्वारे तपासणी, बालरोग तपासणी व उपचार,शल्यचिकित्सा (हर्निया, हायड्रोसिल, अंडाशय गाठी, मूळव्याध, भगंदर), कान, नाक, घसा रोग तपासणी, हाडांचे आजार, संधिवात व मणक्याचे विकार, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड तपासणी, ईसीजी व विविध प्रयोगशाळा तपासण्या, कॅन्सर तपासणी (मुख, स्तन, गर्भाशय),स्त्रीरोग व गर्भवती माता तपासणी, त्वचारोग नुािनख दंत तपासणी, एक्स-रे व उपचार, किडनी आजार तपासणी व आवश्यकतेनुसार डायलिसिस सुविधा, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, रक्त तपासण्या व एक्स-रे सुविधा या शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चावूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चौरमले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.