धाराशिव (प्रतिनिधी)- नळदुर्ग- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिस पथक नाकांबदी व कोबिंग ऑपरेशन करत असताना संशयास्पद कार क्र एमएच 12 जीव्ही 1517 दिसून आल्याने पोलिसांनी गाडी थांबविण्याच्या प्रयत्न केला असता गाडी एका इसमाने रोडच्या कडेला एक बँग फेकून दिल्याने पोलिस पथकाने त्या बॅगची पाहणी केली. त्या बॅगमध्ये दहा प्लॉस्टिकच्या पिशव्यामध्ये हिरवट काळपट अवस्थेतील हशीम ऑईल सदृश्य अंमली पदार्थ वजन 10.382 कि. ग्रॅ एकुण 10 कोटी 38 लाख 20 हजार रूपये किंमतीचा हशीम ऑईल अमंली पदार्थ माल मिळून आल्याने त्याचा पंचनामा करून जप्त करण्यात आले.

सदर प्रकरणी अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोन अनोळखी इसमावर(क्र एमएच 12 जीव्ही 1517)  यांचेविरुध्द गुंगीकारक औषधीद्रव आणि मनोव्यावारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8(सी),20(B)(ii)( C), 25, 29 अन्वये गुरंन 114/2026 असा गुन्हा नळदुर्ग पोलिस ठाणे येथे 20.03.2026 रोजी नोंदवला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्ष शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी मेघना आय. एन., सपोनि सोळुंके, आनंद कांगुने, पोउपनि गिते, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे  पोलीस पथकाने केली


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top