धाराशिव (प्रतिनिधी)- मोहा जिल्हा परिषद गटात महायुतीच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी भव्य प्रचार सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच राज्याचे लाडके नेते, कै. अजितदादा पवार (आजोबा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सौ. सिमाताई राजू झोरी (जि.प. उमेदवार) सौ. रत्नमाला कल्याण दिघे (पं.स. उमेदवार) महायुतीच्या या दोन्ही सुशिक्षित आणि कार्यक्षम उमेदवारांना धनुष्यबाण-कमळ-घड्याळ या महायुतीच्या चिन्हाचे बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे नम्र आवाहन केले. यावेळी मोहा गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.