धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे जि. प. गटाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. जयवंत कुंभार आणि मंगरूळ पं. स. गणाच्या उमेदवार सौ. प्रणिता प्रणव चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार सभा संपन्न झाली. प्रचारसभेच्या सुरुवातीलाच कै.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या सभेला मंगरूळ व परिसरातील नागरिकांनी दिलेला प्रचंड, उत्स्फूर्त आणि विश्वासपूर्ण प्रतिसाद महायुतीच्या विकासनिष्ठ धोरणांना मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दर्शवणारा ठरला.
गावागावांतून मिळणारा जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद पाहता या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दणदणीत विजय मिळवतील, असा ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण विश्वास आहे. महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन उभे करण्याचा निर्धार आहे. यासाठी आपली खंबीर साथ आवश्यक आहे. यावेळी श्री. अजित पिंगळे, श्री. सतीश दंडनाईक, श्री. सुनील काकडे, श्री. अरुण चौधरी, श्री. भागचंद बागरेचा, श्री. आर.के. भाऊ कोल्हे, श्री. प्रणव चव्हाण, श्री. संजय अडसूळ, श्री. गणेश भोसले यांच्यासह मंगरूळ व परिसरातील असंख्य प्रमुख कार्यकर्ते आणि जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.