भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज सोमवार दि. 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरळीत सुरुवात झाली. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांसाठी आज इंग्रजी विषयाचा अनिवार्य पेपर घेण्यात आला. या परीक्षेसाठी एकूण 372 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 356 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षेच्या कामकाजावर केंद्रप्रमुख म्हणून प्रा. रवी सातपुते हे लक्ष ठेवून आहेत.
परीक्षा अत्यंत शांत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असून गैरप्रकार रोखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षाकेंद्रावर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशीची परीक्षा यशस्वीरीत्या पार पडल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुढील परीक्षाही अशाच शांततेत व शिस्तीत पार पडतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे इयत्ता बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशीची परीक्षा शांत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महाविद्यालय प्रशासनाने सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे. परीक्षा पारदर्शक व गैरप्रकारमुक्त व्हावी यासाठी केंद्रप्रमुख प्रा. रवी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तणावमुक्त मनाने परीक्षा द्यावी, असे आवाहन शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष शिंदे यांनी केले.