तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील मौजे भातंब्री येथील गट नं. 53/55 गटाला जाणारा रस्त्याची वरिष्ठांच्या आदेशाची अंमल बजावणी झालेली नाही 2023 पासुन सर्वआदेश पारित आसुन देखील रस्ता खुला करुन न दिल्यामुळे दि.16 फेब्रुवारी 2026 पासुन तहसील कार्यालय, तुळजापुर समोर बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा रायखेल येथील शेतकरी शिवाजी गोरोबा दांगट यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन दिला आहे.   

निवेदनात म्हटले आहे की  गेले अनेक दिवसापासुन मी पाठपुरावा करत आहे. परंतु महसुल विभागाचे याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे गट नं. 53 व 55 गटाचे क्षेत्र सात एकर चार गुंठे क्षेत्र रस्ता खुला करुन न दिल्यामुळे पडिक पडले आहे. यास कारणीभुत महसुल विभाग आहे. जो पर्यंत रस्ता खुला करुन देत नाहीत तो पर्यंत मी उपोषण माघार घेणार नाही. तरी माझ्या जिवीतास कांही बरे वाईट झाल्यास तहसील कार्यालय, तुळजापुर हे जबाबदार राहतील. ज्या शेतकऱ्यांनी कायदा सुव्यवस्था वरती गदा आणुन दमदाटी केली व करीत आहे त्याचे मुळे क्षेत्र व चालु क्षेत्राची सर्व नं. 22 व 26 ची तपासणी करुन वाढीव क्षेत्र कमी करण्याचे आदशे व्हावे व शासन नियमाप्रमाणे गट नं. 60 व 59 च्या बांधावरुन जाणारा रस्ता खुला करुन द्यावा व दोषी वरती दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तरी मे. साहेबांना माझी विनंती आहे की, कृपया आपण सदरील माझे पडीक पडलेल्या गट नं. 53 व 55 गटाचे पंचनामा करण्यात यावा व रस्ता खुला करुन देण्यात यावा व माझे झालेली नुकसान भरपाई व होणारी नुकसान भरपाई मला देण्यात यावी. तसेच यापुढे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या निवेदनाचा प्रत महसुल मंत्री यांनाही पाठवला आहेत.

 
Top