धाराशिव (प्रतिनिधी)- आखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्या वतीने,धाराशिव जि. प. च्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यांना शिक्षकांच्या सामूहिक विविध प्रलंबित प्रश्नांबद्दल माहिती करुन देऊन त्यावर थोडक्यात चर्चा करण्यात आली.
पदवीधर स्वेच्छेने पदावनत करण्याची प्रक्रिया लवकर राबवावी. पदोन्नती( प्रमोशन) करताना सेवाज्येष्ठ शिक्षकांना अगोदर संधी देऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नैसर्गिक न्यायाने प्रक्रिया राबवावी. अशा विविध मागण्या राज्यउपाध्यक्ष श्रलालासाहेब मगर व बशीर तांबोळी यांनी सविस्तर मांडल्या.
यावर सगळ्या मागण्याचा लवकर विचार करून,यावर निर्णय घेऊ असे आश्वासन संघाच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. भेटीच्यावेळी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सोबत मा. शिक्षणाधिकारी खंदारे साहेब, मापारी साहेब, पिकवने साहेब यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.. आढावा बैठक संपल्यानंतर मा. शिक्षणाधिकारी यांच्या दालनात पदावनत प्रकियेबाबत चर्चा करुन लगेच पत्र काढत असल्याचे सांगितले व तसे पत्र ही काल निगर्मित करण्यात आले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर,जिल्हा अध्यक्ष बशीर तांबोळी, कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे,सरचिटणीस अविनाश मोकशे*श्री कैलास मोहिते
,राज्य कार्यकारिणी सदस्य सविताताई पांढरे,जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी साखरे,नप जिल्हा अध्यक्ष पवार सर,महिला आघाडी प्रमुख,अनिषा ताई कदम,जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष सचिन भांडे सर,शाहू पतसंस्था चेअरमन सुरेश भालेराव,कळंब तालुका अध्यक्ष महेंद्र रणदिवे मिलिंद धावारे,केंद्रप्रमुख जगदीश जाकते, तानाजी व्हनकळस, , इस्माईल शेख, हाशम शेख,जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे,परंडा तालुकाध्यक्ष श्री प्रफुल्ल झाडबुके सर, जिल्हा उपाध्यक्ष बब्रुवाहन भोसले,श्रीमती तबसूम बागवान,भोसले सर,धाराशिव तालुका अध्यक्ष नागनाथ मुडबे वाशी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने,भूम तालुकाध्यक्ष युवराज पिंगळे, लोहारा तालुकाध्यक्ष श्री घोडके, श्री चंदनशिवे दाजी,रणदिवे सर,दिपक ठोंबरे सर,मारुती काळे ,इलाही बागवान,मोहन नागटिळक,दिनेश पेठे,हनुमंत माने सर,लक्ष्मण घोडके,महेश अनपट,भालेराव सर, मोहन लष्करे,तुळजापूर तालुका अध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, शेखू जेटीथोर, दयानंद जेटीथोर,विठ्ठल जेटीथोर, बिलाल सौदागर, विठ्ठल भोसले, दत्तात्रय लोहार, गोविंद बाचेवाद , विनायक संकपाळ,ज्ञानेश्वर ढोले, श्री मलंग सर, लक्ष्मण घोडके, श्रीहरी बिडवे,शिवाजी निंबाळकर, सुधीर पवार आणि जिल्हाभरातून आलेले बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
