तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील शैक्षणिक गुणवत्ता व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी बहुचर्चित असलेल्या श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे शुकृवार दि 13 रोजी स्वयंशासन दिन म्हणजेच स्कूल डे आयोजित करण्यात आला होता.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवस शिक्षक म्हणून कार्य करणे, दिवसभराचे कामकाज करणे अध्यापन करून कामकाज सांभाळतो. दिवसभर स्वयंशासन दिनाचे विद्यार्थी कमांडंट निखिल मगर, प्राचार्य समर्थ लगडे तर पर्यवेक्षक म्हणून अथर्व चौधरी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांतश घोडके पर्यवेक्षक डॉ. पेटकर तसेच आजच्या दिवसाचे कमांडर ,प्राचार्य, पर्यवेक्षक व इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री पडनुर श्री चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील संगीत चमूने सुंदर असे स्वागत गीत गायले. याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या आदेश कदम ,पार्थ पाटील, उत्कर्ष गवळी ,सोहम जाधव आणि समर्थ लगडे आदींनी भाषणे केली.आपल्या मनोगतातून त्यांनी माझी शाळा सुंदर शाळा, लाविते लळा जसा माऊली बाळा ! शाळेबद्दल प्रेम आपुलकी व्यक्त केली. आज आम्ही सर्वजण या शाळेमुळेच घडलो, सैनिकी शिस्त काय असते ? ड्रिल काय असते? संचलन काय असते? याची संपूर्ण माहिती आम्हाला मिळाली. असे मनोगत सर्वांनी व्यक्त केले. सर्व शिक्षकांचे अभिनंदन करत आभार मानले.
