तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील सिटी सर्वे नं. 138 मधील क्षेत्रफळ 5.20 चौ. मी. शासकिय जागेमध्ये मध्ये नगर परिषद तुळजापूर मार्फत करण्यात येणारे शौचालयाचे बांधकाम बंद असल्याने सदरील कामगारास ठेकेदारास बिल अदा करू नये व वरील विषयी निवेदन सादर करतोत की, मौजे तुळजापूर येथील मलबा हॉस्पीटल शेजारील सिटी सर्वे नं. 138 मधील क्षेत्रफळ 5.20 चौ. मी. शासकिय जागेमध्ये पुर्वी निजामकालीन शौचालय होते. सदर जागेमध्ये नगर परिषद तुळजापूर मार्फत भाविक भक्तांसाठी नविन सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम ठेकेदारामार्फत करण्यात येत होते. परंतु सदर बांधकाम हे संबंधीत ठेकदाराने गेली पाच महीन्यापासुन बंद ठेवलेले आहे. सदर काम कोणत्या कारणावरुन व कोणाच्या सांगण्यावरुन बंद केले आहे.
याची माहीती देण्यात यावी. तसेच संबंधीत ठेकेदारास शौचायालयाचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत कोणतेही देयके देण्यात येवु नये. सदर ठेकेदारास देयके देण्यात आल्यास त्यास मुख्याधिकारी यांना जबाबदार धरुन त्यांच्या विरोधात तक्रार दावा दाखल करण्यात येईल. तरी आपण वैयक्तीक लक्ष घालुन तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांसाठी सिटी सर्वे नं. 138 मधील शासकिय जागेमध्ये नगर परिषद तुळजापूर मार्फत करण्यात येणारे शौचालयाचे बांधकाम इस्टीमेट प्रमाणे तात्काळ पुर्ण करुन घ्यावे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, कृपया याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.