धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव व तालुका ग्रंथालय संघ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने “धाराशिव ग्रंथोत्सव–२०२५” चे आयोजन १४ व १५ फेब्रुवारी रोजी वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर येथे करण्यात आले आहे.या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शनिवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे.प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार श्री.राणाजगजीतसिंह पाटील,उपाध्यक्ष,महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) आणि खासदार.श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत.तसेच आमदार सर्वश्री.सतीश चव्हाण, विक्रम काळे,कैलास पाटील, प्रा.डॉ.तानाजी सावंत,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता शिवराम केत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे,कळंब उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे,जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,वाशी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे,गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप,गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व.ग सूर्यवंशी,मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह राम मेकले, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोठेवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भैरवनाथ कानडे ही करतील.
१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर जुनी बाजारपेठ,वाशी येथे ग्रंथ दिंडीचे पूजन होणार आहे.या ग्रंथदिंडीचे पूजन नगराध्यक्ष विजया गायकवाड, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे,नायब तहसीलदार पूजा पाटील,राज्य ग्रंथालय धोरण समिती सदस्य राजशेखर बालेकर,राज्य ग्रंथ निवड समिती सदस्य गुलाबराव मगर,राज्य ग्रंथालय सदस्य खंडेराव सरनाईक, पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे.ग्रंथ दिंडीचे संयोजक ह.भ.प.ज्ञानेश्वर सूर्यवंशी पाटील,संचालक- समर्थ रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था, मेडसिंगा हे आहेत.
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने दुपारी १२ ते २ या वेळेत “वाचन संस्कृती आणि आजची स्थिती” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ.दीपक सूर्यवंशी लाभणार असून अनुराग ढवळे,प्रा.अनिता मुदकना, प्रा. सुधीर माने, प्रा.लक्ष्मणराव बिराजदार, प्रा.डॉ.महेश मोटे सहभागी होणार आहेत.परिसंवादाचे सूत्रसंचालन संगीता भांडवले करणार आहेत.त्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीता गुंजाळ - कवडे असतील.कमलाकर भोसले,स्वरां धोरात,गायत्री कवडे, शिवानंद माळी यांचा सहभाग राहणार आहे.सत्राचे सूत्रसंचालन सर्जेराव इंदलकर करणार आहेत.
सायंकाळी ६ ते ९ या वेळेत विविध गुणदर्शन कार्यक्रमांसह सांस्कृतिक सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सदाशिवराव जगताप (अध्यक्ष, अजिंक्य विद्यामंदिर वाशी) असतील.प्रा.अशोक दुनघव सूत्रसंचालन करणार असून शालेय विद्यार्थी सहभाग घेणार आहेत.
तसेच ग्रंथोत्सवाच्या कालावधीत सकाळी १०.०० ते सायं. ७.०० या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्री सर्वांसाठी खुले राहणार आहे.
रविवार,दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी परिसंवाद,कविसंमेलन व समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.परिसंवाद
(स. १० ते दुपारी १२.३०)
विषय : राजमाता अहिल्यादेवी होळकर – जीवन व कार्य
अध्यक्ष : श्री. युवराज (बप्पा) नळे (साहित्यिक,इतिहास व पुरातत्त्व संशोधक),सहभाग : डॉ.क्रांती मोरे व सौ. माधुरी घोडके,सूत्रसंचालन : श्रीमती साधना खिडेकर ह्या करतील.कविसंमेलन (दुपारी १.३० ते ४),अध्यक्ष : श्रीमती.अश्विनी धाट,
सहभागी कवी : सुवंता तांबे,श्रीमती शशिकला गुंजाळ,प्रा.मनीषा नाईकवाडे,संगीता भांडवले, संध्याराणी कोल्हे,आशा राऊत, आनंदी पाटील,ॲड.जयश्री तेरकर, मीना महामुनी,सरिता उपासे,शरद गायकवाड,राजेंद्र सगर,सुधीर कांबळे,राजेंद्र टाचतोडे,गंभीरे पेंटर, आश्रुबा कोठावळे,डॉ.मधुकर हुजरे, बाळासाहेब मगर,शंकर खामकर, काशिनाथ बिराजदार सहभागी होतील.सूत्रसंचालन अविनाश भारती ही करतील.
ग्रंथोत्सवाचा समारोप(दुपारी ४ ते ६)
अध्यक्ष : प्राचार्य डॉ.ए.बी.कदम (अध्यक्ष,कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय,वाशी)
प्रमुख पाहुणे : प्रा.श्री.अशोक दुनघव श्री. अंकुर सोनटक्के, प्रा.श्री.एस. एल. पवार हे असतील.सूत्रसंचालन : श्री. सुहास सरवदे हे करतील. ग्रंथप्रेमी नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून ग्रंथोत्सवाची शोभा वाढवावी,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे वआयोजकांनी केले आहे.