भूम (प्रतिनिधी)- तालूक्यातील माणकेश्वर येथील प्राचीन हेमाडपंथी वास्तुशिल्प कलेचा उत्तम नमुना आसलेले सुर्यमुखी महादेव आहे.  मंदीराच्या गाभा-यात महादेवाची मोठी पींड आहे महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तानी या ठीकाणी दर्शना साठी मोठी गर्दी  केली होती.

महाशिवरात्री महोत्सव  श्रीक्षेत्र माणकेश्वर येथील  महादेव मंदिर येथे दिनांक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत महाशिवरात्री महोत्सव संपन्न होणार आहे. त्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात  कीर्तने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी शालेय विद्यार्थी, तरुण, शिवभक्त व ग्रामस्थांसाठी हरिनाम सप्ताहात शिवकालीन शस्त्राचे भव्य प्रदर्शन  तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान भूम व ग्रामस्थ माणकेश्वर यांच्या वतीने करण्यात आले होते. त्याचा देखील लाभ भाविकांनी घेतला.

तसेच दैनंदिन कार्यक्रमात दररोज संध्याकाळी किर्तन पहिला दिवस ह.भ.प सतीश महाराज कदम, दुसरा दिवस ह.भ.प संस्कार महाराज खंडागळे, तिसरा दिवस ह.भ.प बालाजी महाराज बोराडे, चौथा दिवस ह.भ.प सुदाम महाराज पालवे, चौथा दिवस ह.भ.प गणेश महाराज अंधारे, पाचवा दिवस ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पाटील असे सर्व कीर्तने संपन्न होतील तसेच दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी कीर्तन होईल तसेच संध्याकाळी ठीक सात वाजता नयनरम्य असा “दीपोत्सव“ संपन्न होईल व दुसऱ्या दिवशी काला झाल्यानंतर महोत्सवाची समाप्ती होईल तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र  माणकेश्वर महादेव मंदिरावर होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आसे अवाहन हभप गणेश महाराज यांनी केले आहे.

 
Top