धाराशिव (प्रतिनिधी) - बोरी येथे जमिनीच्या वादाने गंभीर वळण घेतले असून संरक्षित कुळ हक्क डावलल्याचा आरोप करत सुरवसे कुटुंबीयांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. बोरी गावातील गहिनिनाथ श्रीपती सुरवसे व विश्वभर श्रीपती सुरवसे यांनी त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीबाबत सविस्तर तक्रार दाखल केली आहे.

संरक्षित कुळ म्हणून 7/12 उताऱ्यावर नावे नोंदविण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय, वाशी येथे अर्ज सादर केला होता. मात्र संबंधित कागदपत्रांचा पुरेसा विचार न करता तहसीलदारांनी “कुळ नाहीत” असा निर्णय दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात अप्पर जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे अपील दाखल असून प्रकरण सध्या प्रलंबित आहे.

दरम्यान, अपील प्रलंबित असतानाच दादा दत्तु जाधव व प्रिया दादा जाधव यांनी सुरेश वसंत कुलकर्णी व रमेश वसंत कुलकर्णी यांच्याशी संगनमत करून संबंधित जमिनीची 9 डिसेंबर 2025 रोजी खरेदी केल्याचा आरोप सुरवसे कुटुंबीयांनी केला आहे. खरेदीनंतर लगेचच जमिनीत येऊ नये, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संरक्षित कुळ म्हणून न्याय द्यावा, तसेच बेकायदेशीर खरेदी व धमकीप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुरवसे कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे. 

 
Top