धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात पराभव पत्कारावा लागला. या संदर्भात मंथन बैठक आयोजित केली होती. काही बुथ प्रमुख व काही शाखा प्रमुख यांनी काम न केल्याचा ठपका या बैठकीत ठेवण्यात आला होता. ही निवडणूक धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशा स्वरूपात झाल्यामुळे आमच्या उमेदवारांचा पराभव झाला. अशी चर्चा बैठकीत झाली असताना मंथन बैठकीतला व्हिडीओ व्हायरल करून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात बैठक झाल्याची अफवा पसरविली गेली असल्याची माहिती शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक तथा सरपंच परिषदेच्या पदाधिकारी जिन्नत सय्यद यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

यावेळी भगवान बांगर, विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रल्हाद आडागळे, शिक्षक सेनेचे कोहिनूर सय्यद, दिपक मुळे आदी उपस्थित होते. यावेळी भगवान बांगर यांनी आमच्या मतदारसंघात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. अतिवृष्टी काळात एकमेव खासदार ओमराजे निंबाळकर आमच्या मदतीला धावून आले. मी भाजपमधून शिवसेनेत आलो आहे. केवळ खासदार यांच्या कार्यतत्परतेमुळेच आलो असल्याचे सांगितले. यावेळी भगवान बांगर भावनिक होवून बैठकीतील एका गद्दाराने चुकीच्या पध्दतीने व्हिडीओ व्हायरल केला आहे. असे सांगून संबंधित व्यक्तीची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे तक्रार करणार आल्याचेही सांगितले. 


 
Top