धाराशिव (प्रतिनिधी)- येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल धाराशिव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडले

याप्रसंगी स्नेहसंमेलनाचे दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्या सुशीला देवी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ.सौ. सुलभाताई देशमुख, अक्षरवेलच्या संस्थापक अध्यक्ष सौ. डॉ.रेखा ढगे, संस्थेच्या संस्थापिका श्रीमती कमलताई नलावडे, सदस्य सौ मंजुषा नलावडे, तसेच मुख्याध्यापिका सौ. अर्चनाताई शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. मुक्तांगणच्या मुलांनी देशभक्तीपर गीते, कोळी गीते, देवीची गीते यांचे सादरीकरण केले. नर्सरी, जूनियर, सीनियर के.जी च्या विद्यार्थ्यांनी बालगीताचे उत्तम प्रकारे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top