धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील वाघोली येथे आफुच्या झाडाची लागवड केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण 12 लाख 77 हजार 625 रूपये किंमतीचा माल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक मोरे पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वाघोली शिवारातील शेत गट नं 149/1 मध्ये इसम नामे अजित जोतीराम सुरवसे, वय 36 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव यानी त्याचे शेतात आफुच्या झाडाची लागवड केलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन बातमीच्या ठिकाणी हजर रहा असे सांगीतले. स्टाफ सह सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास अफुच्या झाडाची लागवडी बाबत चौकशी केली असता त्यांने सदर शेतात आफुच्या झाडाची लागवड केल्याचे सागिंतले. सदर शेतातील 85 किलो 175 ग्रॅम वजनाचा अफु एकुण 12 लाख 77 हजार 625 रूपये किंमतीचा माल मिळून आल्याने सदर माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन जप्त करुन ताब्यात घेउन आफुची लागवड करणारे अजित सुरवसे यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हाके, पोलीस हावलदार भिमराव ढगे, पोलीस अमंलदार आरसेवाड, चालक पोलीस अमंलदार बनाळे, महिला पोलीस अंमलदार जाधव यांचे पथकाने केली आहे.