तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री कालेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात प्रारंभ झाला.

अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी साहेबराव सौदागर, कल्याण कानडे, दत्तात्रय स्वामी,हभप महेश महाराज भोरे व भक्तगण उपस्थित होते.


 
Top