वाशी (प्रतिनिधी)-  नुकत्याच पार पडलेल्या जि.प. आणि पंचायत समिती निवडणूक 2026 ची मतमोजणी सोमवारी दि.9 फेब्रुवारी रोजी वाशी तहसील कार्यालयात झाली.या निकालातून तालुक्यातील राजकारणावर शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. वाशी पंचायत समितीवर सहापैकी पाच जागा जिंकत शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. तसेच वाशी तालुक्यातील तीनपैकी तीन जागाही शिवसेनेने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अनेक बुजुर्ग राजकारण्यांना धक्का देत तरुण उमेदवारांनी आपला विजय मिळवला आहे.

पारगाव जि.प.गट- तळेकर सविता विकास (शिवसेना), पारा जि.प. गट - उंदरे अश्विनी सुनिल (शिवसेना) तेरखेडा जि.प.गट- चव्हाण संदेश उर्फ विकी सोमनाथ (शिवसेना) हे विजयी झाले आहेत. 


पंचायत समिती विजयी उमेदवार

पारगाव गण- मोटे कमल प्रदीप (राष्ट्रवादी) सरमकुंडी गण- गायकवाड प्रणिता प्रविण (शिवसेना) पारा गण- भराटे अशोक रामदास (शिवसेना), बावी गण- रणदिवे नितीन शिवाजी (शिवसेना), इंदापूर गण- शिंदे अरुणा रावसाहेब (शिवसेना), तेरखेडा गण- घोलप पूनम बालाजी (शिवसेना) 

 
Top