मुरुम (प्रतिनिधी)- ज्ञान आणि कौशल्याच्या आधारे जीवनात उत्कर्ष साधता येतो.तुम्हाला मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी मोठी स्वप्ने पहा व स्वप्नपूर्तीसाठी निरंतर झटत रहा, असे प्रतिपादन पुणे येथील सी. ए. राजेंद्र डांगी यांनी केले. ते श्री माधवराव पाटील महाविद्यालय येथे बोलत होते.
महाविद्यालयातील वाणिज्य विभागआयोजित आत्मनिर्भरता आणि वाणिज्य शाखेतील व्यवसायाच्या संधी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. प्रत्येकाने स्वप्ने पाहिलीपाहिजेत. परंतु,ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याकडेकिमान कौशल्ये असणे गरजेचे असते.जन्माने सर्व सारखेच असून कर्माने माणूसमोठा होतो. मोठे होण्यासाठी आधुनिक शिक्षण घेत उंबरठा ओलांडावा लागतो.कोणत्याही क्षेत्रात जाण्यापूर्वी त्या क्षेत्रातील संधी, तेथील सुरक्षितता, त्या क्षेत्राचे भविष्य आदी बाबी तपासल्या पाहिजेत. वाणिज्य शाखेत व्यवसायाच्या अनेक संधी असूनआयुष्य उन्नत करण्यासाठी त्या मिळविल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना सी. ए.राजेंद्र डांगी होते.प्रमुख उपस्थितीत वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.रविद्र गायकवाड हे होते. त्यांनी म्हणाले की, विद्यमान काळात कौशल्याधारित शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. आजचे जग हे झपाट्याने बदलत आहे.
जिथे पोट भरणार नसेल तिथे वेळ वाया घालने परवडणारे नसून वाणिज्य शाखेतील नव्या संधी शोधा, आर्थिक हित साधणाऱ्या व्यवसायाकडे वळा, असेही ते म्हणाले. यावेळी वाणिज्य विभागाचे डाँ. सुधीर पंचगल्ले, रसायनशास्ञ विभागाचे डाँ.सुजित मटकरी, प्रा.भुषण पाताळे वाणिज्य विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याचा परिचय व प्रास्ताविक डाँ.रविद्र गायकवाड यांनी करुन दिला तर आभार प्रदर्शन डाँ.सुधीर पंचगल्ले यांनी मानले.
