तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दिवटी) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत विज्ञान संशोधन क्षेत्रात जगभर नाव कमावणारे प्रा. बापूराव बब्रुवान शिंगटे यांना मराठी विज्ञान परिषदेचा अत्यंत प्रतिष्ठित असा ‌‘प्रा. मनमोहन शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार 2025‌’ जाहीर करण्यात आला असून हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष जेष्टराज जोशी यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.

क्लिक केमिस्ट्री या आधुनिक व अत्यंत महत्त्वाच्या संशोधन क्षेत्रात त्यांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्रा. शिंगटे यांच्या नावावर तीन पेटंट नोंदणीकृत आहेत. तसेच जगभरातील नामांकित संशोधन मासिकांमध्ये त्यांचे संशोधनपर लेख सातत्याने प्रकाशित होत असतात. त्यांच्या संशोधनामुळे केवळ तुळजापूर तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचा गौरव वाढला आहे. सलगरा गावासाठी अभिमान; तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा शेतकरी-मजूर कुटुंबातून पुढे येत, शिक्षणाची जिद्द आणि विज्ञानातील चिकाटी यांच्या जोरावर प्रा. बापू शिंगटे यांनी आज जगभरात सलगरा (दिवटी) गावाचे नाव पोहोचवले आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि संशोधनाची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.

 
Top