मुरुम (प्रतिनिधी)- प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रयोगशाळेचे उद्घघाटन व सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य उल्हास घुरघुरेसर  व श्री शाळू सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप मुख्याध्यापक कोंढारे सर पर्यवेक्षक परसाळगे सर श्री श्री महामुनी सर श्री राठोड सर,श्री शिवशरण तांबडे सर  श्री चंद्रशेखर कोराळे सर, श्री संतोष बिंदगे सर, श्री चव्हाण सर श्री स्वामी सर, श्री प्रशांत मुरूमकर सर, कु.अनिशा फुगटे मॅडम कु.आरती कोराळे मॅडम, सौ.सपाटे मॅडम, सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. 28 फेब्रुवारी हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन  म्हणून साजरा केला जातो. 1928 मध्ये सर सी.व्ही. रमण यांनी रामन इफेक्ट या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा केली होती ज्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. या दिवशी देशभरात वैज्ञानिक जागृती आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूमच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी वेगवेगळे विज्ञान प्रयोग सादर केले. यामध्ये सहावीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. श्रेया बालाजी भोसले,समीक्षा संजय शेळके,आस्था अशोक गोडबोले, अर्निया विजयकुमार शेळके, अरशिया पटेल ,बुशरा  शेख, मीरा मुळे,धनश्री राठोड, संस्कृती टेकाळे,सुकृती मुदकन्ना, शुभ्रा मुदकन्ना,

  समृद्धी खुणे, मेघना कटारे, काव्या फिरंगे, तन्वी चव्हाण, श्रावणी वाकळे, समीक्षा शेळके,श्रद्धा येवले,धनश्री राठोड, साक्षी मुदकन्ना, अनन्या महिंद्रकर, रोहन धुमाळ,अथर्व कोरे,शशिकांत भोसले,सम्यक सुतके,महेश चिलोबा,प्रणव वाघ, श्लोक झुरळे,सोमनाथ सुरवसे, मयंक मिणीयार,प्रशांत शेंडगे, रितेश दुर्गे,अब्दुल मकानदार, आरुष भोसगे,युवराज वाकळे, गणेश खुणे,कपिल हिरेमठ,प्रथमेश जिडगे या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. अनिशा  फुगटे मॅडम श्रीमती स्वामी मॅडम,कोराळे मॅडम यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कु,आस्था अशोक गोडबोले यांनी केले आभार श्रेया बालाजी भोसले यांनी मानले.

 
Top