जळकोट (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील सुपुत्र मंत्रालयात सेवेत असलेले सन्माननीय बालाजी काशीनाथ गुळे यांची लिपिक पदावरून सहायक कक्षअधिकारीपदी पदोन्नती झाल्याने जळकोटसह तुळजापूर तालुक्यातून नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट व ग्रामस्थ आदींकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.
बालाजी गुळे यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यांचे शिक्षणही अत्यंत खडतर परिस्थितीत व आर्थिक चणचणीत झाले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलकीची असूनही त्यांनी अत्यंत जिद्दीने विविध ठिकाणी काम करून उच्चशिक्षित झाले. त्यांचे शिक्षण एम. ए., बी. एड. व पी. एच. डी. पर्यंत झालेले आहे. तसेच दुर्दैवाने ते एका पायाने दिव्यांग आहेत असे असूनही त्यांनी आपल्या शारीरिक कमजोरीचे भांडवल न करता अत्यंत जिद्दीने आर्थिक परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण पूर्ण केले.
बालाजी गुळे यांनी मंत्रालयात सेवेत रुजू होण्यापूर्वी विविध शैक्षणिक संस्थेमध्ये प्राध्यापक व प्राचार्य या पदावरही विना मोबदला सेवा बनावली आहे. भविष्यात सदर संस्थेस शासनाकडून अनुदान मिळून वेतन चालू होईल या आशेवर विना मोबदला सेवा बजावत असतानाच मंत्रालयात लिपिक टंकलेखक या पदासाठीची भरतीची जाहिरात निघाल्याने त्यांनी सदर पदासाठी अर्ज दाखल केला व त्यात ते यशस्वी झाले.
लिपिक टंकलेखक पदावर त्यांनी मंत्रालयातील वित्त विभाग व गृह विभागात काम केले आहे. विद्यमान परिस्थितीत ते गृह विभागातच कार्यरत आहेत व पदोन्नती नंतरही त्यांना गृह विभागातच नेमणूक देण्यात आली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीचे शासनाकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी परिपत्रक निघाले आहे. गुळे यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सहाय्यक कक्ष अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
बालाजी मुळे यांच्या या यशामध्ये कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट व ग्रामस्थांचीही साथ मिळाली असल्याचे ते नम्रपणे नमूद करतात. बालाजी गुळे यांच्या पदोन्नतीमुळे त्यांचे मित्र पत्रकार संजय रेणुके व भीमाशंकर यादगौडा यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन करून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
