मुरुम (प्रतिनिधी)- आदर्श विद्यालयात एस. एस. सी. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सैपन शेख हे होते तर प्रमुख अतिथी श्रमजीवी शिक्षण संस्थेचे सचिव मा. रामकृष्णपंत खरोसेकर हे होते. यावेळी पर्यवेक्षक श्रीपाद कुलकर्णी व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुदेश माने यांची उपस्थिती होती . प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता, सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . सत्कार सोहळ्यानंतर वर्षभर घेण्यात आलेल्या बौद्धिक ,क्रीडा व सांस्कृतिक अशा स्पर्धातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरव करण्यात आला . तसेच वर्षभर सर्व क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य दाखवलेले हुशार व संयमी, आज्ञाधारक अशा दोन विद्यार्थ्यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला . त्यात विनायक ज्ञानेश्वर भोसले - 10 वी व कु.मिमरा महमंद रफिक काझी त्या दोन विद्यार्थ्यांचा (सन 2026 ) यावर्षीचे आदर्श विद्यार्थी म्हणून शाळेतर्फे मान्यवरांच्या स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . तसेच यावर्षीचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून 5 ते 7वी मधून कु. खुशी काशिनाथ राठोड - 7वी व शहाजी संतोष माने 7वी व 8वी ते 10 वी मधून कु. कृष्णवेणी अभिमन्यू आबाचणे - 10वी तर सुभान शाहबुद्दीन पठाण 10वी या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला . तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या संस्कृतिक कार्यक्रमातील उत्कृष्ट कलाकारांचा सन्मान करण्यात आला तसेच गणित प्रदर्शनातील उष्कृष्ठ साहित्य निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व क्रीडा व बौद्धिक स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला . याप्रसंगी प्रमुखअतिथी मा . खरोसेकर साहेब म्हणाले की , यशस्वी होणे ही केवळ नशिबाची गोष्ट नसून तर मित्रांनो ती प्रत्येक व्यक्तीत असलेल्या विशिष्ट चांगल्या गुणांवर आधारित असते जो विद्यार्थी सकारात्मक दृष्टिकोन , दृढइच्छाशक्ती ,चिकाटी, शिस्त आणि वेळेचे नियोजन करतो . आणि स्वतःवर विश्वास ठेवून सतत कांहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती, नाविन्याचा शोध घेण्याची धडपड बाळगतो तो विद्यार्थी निश्चितच जीवनात यशस्वी होतो .
अपयश आले तरीही त्यातून धडा घ्या , यशस्वी व्यक्ती हा अपयश पचवूनच यशापर्यंत आलेला असतो .अपयशाला न घाबरता , झालेल्या चुकांमधून शिकून , दररोज थोडे अधिक प्रयत्न करा , कारण प्रत्येक दिवस आयुष्यात प्रगती करण्याची एक नवी संधी घेऊन येतो हे विसरू नका . या विद्यालयात प्राचार्य शेख सर हे एक अनुभवी व नवीन काहीतरी करण्याची धडपड करणारा माणूस आहे , सतत वेगवेगळे उपक्रम , स्पर्धा , प्रदर्शन अशा कार्यक्रमाचे आयोजन करतात , ते केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला विकास व्हावा यासाठीच . आपण जीवनात यशस्वी व मोठी व्यक्ती व्हावी या इच्छेपोटी सतत कांहीतरी कार्यक्रम ठेवत असतात . याचा फायदा घ्या ,आज क्रीडा , सांस्कृतिक व अभ्यासक्रमात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या यशस्वी व विजेत्या विद्यार्थ्यांना आमच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव केला आहे त्यांचे खुप अभिनंदन व ज्यांना बक्षीस मिळाले नाही अशांनी निश्चितच पुढच्या वर्षी बक्षीस मिळवावे ,त्यांनी मिळवण्याचा चांगला चिकाटीने प्रयत्न करावा असा संदेश यावेळी दिला .
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य सैपन शेख सर म्हणाले की
आजचा हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा आहे कारण तुम्ही वर्षभर अभ्यास क्रीडा सांस्कृतिक अशा विविध स्पर्धेत यश संपादन केलात त्यांच्या यशाचा गौरव करण्याचा आजचा हा क्षण आहे . जीवनात केवळ पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे नसून आपला शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास होणे हेच आमच्या विद्यालयाचे ध्येय आहे असून आम्ही सातत्याने बदलत्या काळाची गरज ओळखून सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यशस्वी विद्यार्थी घडवण्याचा आमच्या सर्व शिक्षकांचा प्रयत्न असतो . प्रामाणिकपणा आणि आत्मचिंतन हेही यश मिळवण्यासाठी आवश्यक गुण आहेत ,तुमचे ध्येय ,उद्देश स्पष्ट असावेत तरच आपल्याला दिशा निवडता येते . सातत्य व चिकाटीने आपले ध्येय वेळेत साध्य कराल तरच आजच्यासारखे तुमचे नेहमी कौतुक होईल .ज्या स्पर्धेत आपण पारितोषिक मिळवत आहात त्या स्पर्धेत तुमच्या स्पर्धकांचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले आहेत. कुठेतरी योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी पडली म्हणूनच तुम्ही विजेता झालात . तर ज्यांना बक्षीस मिळाले नाही अशांनी आत्मचिंतन करावे व निराश न होता पुढील वर्षी जिद्दीने प्रयत्न केलात तर यश आपलेच आहे असे म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्रीपाद कुलकर्णी यांनी केले .तर विद्यार्थी मनोगतात दहावीतील विनायक भोसले व सृष्टी शिंदे या दोन विद्यार्थ्यांनी शाळेतील विविध उपक्रम व शिक्षकांचे कौतुक करून आपण दिलेल्या ज्ञानाची शिदोरी हे आमचे उज्वल भवितव्य घडवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल व आम्ही ती समाज उपयोगासाठी उपयोगात आणू अशी ग्वाही निरोपप्रसंगी या दोन विद्यार्थ्यानी दिली .तर शिक्षकांमधून प्रशांत सोमवंशी हे मनोगत मांडताना म्हणाले की ,निरोप घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी नेमके काय प्रयत्न करावेत हे सांगून या बॅचमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या कार्याचा आढावा यावेळी सर्वांसमोर ठेवला व येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या . तसेच दरवर्षी पाचवीपासून ते दहावीपर्यंत आलेल्या दहावीतील हुशार संयमी व आज्ञाधारक अशा दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यात विनायक ज्ञानेश्वर भोसले व कु . मिमरा मोहम्मद रफी काजी हे यावर्षीचे आदर्श विद्यार्थी ठरले तर यावर्षीचे उत्कृष्ट खेळाडू 5वी ते 7वी मधून कु .खुशी काशिनाथ राठोड व चि. शहाजी संतोष माने तर 8 वी ते 10वी मधून कु . कृष्णवेणी अभिमन्यू आबाचणे व सुभान शहाबुद्दीन पठाण या विद्यार्थ्यांचा यावर्षीचे विद्यालयातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षकश्रीपाद कुलकर्णी यांनी मांडले. सूत्रसंचालन श्रीमती पौर्णिमा दाहोत्रे यांनी केले तर पारितोषिक वाचन तात्याराव फडताळे व दयानंद उमाटे यांनी केले ,आभार रंगनाथ चाटे यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश शेंडगे, शिवराज सुरवसे, नीलिमा कुलकर्णी, बेबीसरोजा स्वामी, स्वरूपा चौधरी, विकास कांबळे यांनी पुढाकार घेतला.
