वाशी (प्रतिनिधी)- येथील काशी विश्वनाथ मंदिरात महाशिवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दररोज सकाळी पूजा,शिवलीलामृत,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी भजन,रात्री कीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी(दि.15) पहाटे पासूनच भाविकांनी दर्शन,अभिषेक करण्यास सुरूवात केली. दिवसभर शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले.यात महिलांची संख्या मोठी होती.दर्शनानंतर शिवरात्र वात लावण्यासाठी महिलांची मोठी संख्या दिसून आली.
