धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. प्रमोद शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 09:00 वा.करण्यात आले आहे.
प्रा.प्रमोद शहा हे ज्येष्ठ अर्थतज्ञ असून सुप्रसिद्ध लेखक आहेत.त्यांनी विविध महाविद्यालयात व प्रसार माध्यमावर व्याख्याने दिलेली आहेत. विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर प्रभावीपणे कार्य केले आहे.अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. याबरोबरच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील केलेले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या ज्वलंत विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख हे असणार आहेत.
