भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील ईट येथील सात वर्षीय इब्राहिम फैसल काझी या चिमुकल्याने इस्लाम धर्ममध्ये सर्वात पवित्र समाजला जाणारा रमजान महिन्याचा पहिला रोजा पूर्ण केला आहे. गुरुवार दि.19 फेब्रुवारीपासून मुस्लिम धर्मियांच्या रमजानच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचा पहिला उपवास इब्राहिम याने गुरुवारी पहाटे 5:30 ते संध्याकाळी 6:30 असा दिवसभर  अन्न-पाण्याविना उपाशी राहून त्याच्या आयुष्यातला पहिला रोजा पूर्ण केला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top