धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‌‘दर्पण‌’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेची भक्कम पायाभरणी केली.या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक ज्ञानासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकत समाजप्रबोधनाचे कार्य केले.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस वरिष्ठ लिपिक नंदू पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी वरिष्ठ लिपिक श्रीमती.आशा बंडगर,कनिष्ठ लिपिक चित्रा घोडके,वाहनचालक मोहन कोळी तसेच दप्तरी अनिल वाघमारे उपस्थित होते.


 
Top