धाराशिव (प्रतिनिधी)-  गेल्या वर्षी धाराशिव शहरात प्रथमच आयोजित केलेल्या “साडी वाकेथॉन“ ला  महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुन्हा एकदा यावर्षी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रविवारी पहाटे 5.45 वाजता तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे कॅन्सर जनजागृतीसाठी साडी वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

ओस्ला ओयॉसीस लेडीज फाउंडेशन, धारासुरमर्दिनी महिला फेडरेशन, आय एम ए डॉक्टर वुमन्स विंग, अक्षरवेल महिला साहित्य मंडळ,  रोटरी क्लब ऑफ धाराशिव, निमा वुमन्स फोरम यांच्या वतीने द रियल इस्टेट मॉल प्रस्तुत साडी वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. वॉकेथॉनचा मार्ग हा तुळजाभवानी स्टेडियम मार्गे, आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलीस मुख्यालय मार्गावरुन, बसवेश्वर चौक ते फुलाई मल्टीस्टेटच्या समोरुन यू टर्न घेऊन वापस तुळजाभवानी स्टेडियम येथे पार पडणार आहे. याच कार्यक्रमात कॅन्सर जनजागृती मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील एन्कॉलॉजिस्ट डॉ. श्रुती गांधी येणार असून त्या कॅन्सर बद्दल सर्व महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. माया जगदीश पाटील, पुर्वी अभय गजेंद्रगडकर,  प्रतिभा श्रीकांत देशमुख, स्नेहा बर्डे, प्रगती कोळगे या कर्तृत्ववान महिलांना धाराशिव नारीशक्ती ने सन्मानित करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त महिलांच्या मनोरंजनाकरिता महिलांसाठी योगा झुंबा चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमानंतर पूर्ण परिवारासाठी फुड फेस्टीव्हल चे ही आयोजन करण्यात आले आहे. तरी धाराशिव मधील जास्तीत जास्त महिलांना यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 
Top