भुम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व परीक्षक विज्ञान शिक्षक संतोष राऊत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सी व्ही रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच फीत कापून अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रस्ताविकात विज्ञान शिक्षक उत्तरेश्वर पायघन यांनी विज्ञान दिन का साजरा केला जातो ? याविषयी सविस्तर माहिती सांगितली. शाळेतील 24 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण केले. यावेळी मनोगतात अतिथी म्हणाले की, “ विद्यार्थ्यांनी कोणताही प्रयोग करत असताना त्यातील तत्त्व समजून घेतले पाहिजे .सी व्ही रामन यांनी पाण्याचा वा आकाशाचा रंग निळा का आहे ?यामागील तत्त्व समजून घेतले व ते 28फेब्रुवारी 1928 रोजी सादर केले . यालाच 1930 सालचे विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. “ असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते .कार्यक्रमाला काकासाहेब पवार,दयानंद पाटील, उत्रेश्वर पायघन ,अविनाश जोशी , राजेंद्र गाडे , दत्तात्रय गुंजाळ ,प्रतिभा मुकटे मॅडम , सुनील जाधवर ,नितीन पवार ,कैलास शिंदे ,हरीश साठे ,सागर आकोस्कर ,अनंता झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले तर आभार अविनाश जोशी यांनी मानले.

 
Top