भुम (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशीच्या यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी (ता.भूम) येथे शनिवारी वेताळ स्वामी मंदिरात कर्मवीर व्याख्यानमाला समारोप कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी बोलताना  प्रा.शामसुंदर डोके म्हणाले की, कर्मवीर मामासाहेब यांचे जीवन व कार्य विशद केले. त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय या मंत्राचा जीवनभर मंत्र जपला व शिक्षणाची गंगा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणे बार्शी परिसर व धाराशिव जिल्हयात पोहोचवली म्हणून च आज वाशी येथे महाविद्यालय 1972 मध्ये उभे राहिले असे विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पांडुरंग आहेर यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय क्षीरसागर होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत रोटे,विठ्ठल आहेर, हरिदास आहेर, शिशुपाल साळुंके,दादासाहेब साळुंके, लक्ष्मण आहेर , रुपाली गवळी, सविता गिरी, रजनी आहेर ,अंगणवाडी सेविका राजश्री चव्हाण, सविता जालन, आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन  सोमनाथ तौर यांनी केले तर आभार संघमित्र लोखंडे यांनी मानले.

 
Top