धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशानंतर, महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत आज मुंबई येथे शिवसेना नेते व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मल्हार पाटील, नितीन काळे आदींनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. हा सत्कार म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लावलेली फिल्डींग असे बोलले जात आहे.
या दणदणीत यशामागे जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची अथक मेहनत आणि सक्षम नेतृत्व आहे. आगामी काळात महायुतीची एकजूट अधिक मजबूत करत विकासाभिमुख राजकारणाचा वेग वाढवण्याचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यातून जिल्ह्याच्या विकासासाठी महायुती सरकारकडून भरघोस निधी मिळत असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज संस्थांवर महायुतीचा झेंडा फडकल्याने आता विकासाला नवी दिशा मिळणार आहे. असे म्हटले जात आहे. यावेळी भाजपचे सुनिल चव्हाण, ॲड. अनिल काळे, संताजी चालुक्य, शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे, योगेश केदार, शिवाजी कापसे आदी उपस्थित होते.
