भुम (प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) संघटनेने धाराशिव जिल्ह्यासाठी नव्या नेतृत्वाची घोषणा केली असून, ॲड.मुशरफ अल्ताफ सय्यद यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय नेतृत्वाचा विश्वास NSUI चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार आणि राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, महाराष्ट्र प्रभारी अक्षय यादव क्रांतिवीर आणि कांता ग्लावा यांनी नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले.


जिल्ह्यातील विद्यार्थी प्रश्नांना मिळणार बळ 

ॲड.मुशरफ अलताफ सय्यद यांची निवड ही त्यांच्या संघटनेप्रती असलेल्या निष्ठेचे फळ मानले जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या, शैक्षणिक सोयीसुविधा आणि महाविद्यालयीन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


निवडीनंतर ॲड.मुशरफ सय्यद यांनी व्यक्त केलेल्या भावना:

“राष्ट्रीय आणि प्रदेश नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यास मी पूर्णपणे न्याय देईन. धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज बुलंद करणे आणि संघटनेची ध्येयधोरणे शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल.“या निवडीनंतर धाराशिव काँग्रेस आणि NSUI च्या वतीने ॲड. मुशरफ सय्यद यांचे ठिकठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा NSUI अधिक आक्रमकपणे कार्य करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


 
Top