धाराशिव (प्रतिनिधी)-  शेती, शेतकरी, ग्रामीण युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवून आणणारा ठोस विकासाचा आराखडा हाच आमचा अजेंडा असून, केवळ घोषणा नव्हे तर परिणामकारक अंमलबजावणी हेच आमचे धोरण आहे. शेतीसाठी सिंचन व पाणलोट विकासाच्या कामांना गती देत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवणे, दुष्काळ व अवकाळी संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि शेतमालाला योग्य व हमीभाव मिळवून देणे हा आमचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था अधिक दर्जेदार, आधुनिक व सुविधा-संपन्न करणे हे आमचे प्राधान्य असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळा, डिजिटल शिक्षण, क्रीडा व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचा शहरी विद्यार्थ्यांशी होणारा अन्यायकारक फरक दूर केला जाईल. अशी माहिती खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते. आरोग्याच्या बाबतीत गावपातळीवर वेळेवर, सक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट केली जातील. असे आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. 

 
Top