भूम (प्रतिनिधी)- नविन स्मार्ट कार्ड प्रणालीचा भूम येथील बस स्थानकात दि 20 फेब्रुवारी रोजी शुभारंभ करण्यात आला.

जेष्ठ नागरिक वय वर्ष 75 वरील फ्री सवलत आसलेल्या प्रवाशांना सर्व महिलांना अंध अपंग व विद्यार्थी सवलत व सवलत नसलेल्या प्रवाशांनासुद्धा याचा सर्वाना लाभ घेता येणार आहे. याचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी एका महिला लाभार्थी यांची नोंदणी यावेळी करण्यात आली. यावेळी आगार प्रमुख साहेब उल्हास यशवंत शिनगारे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक अभिजीत संजय कवडे, वाहतूक निरीक्षक नागेश सूर्यकांत गायकवाड, लिपीक गणेश वाघमारे, चालक गिरी, व स्मार्ट कार्ड कंपनीचे प्रतिनिधी मुकुंद यादव आनंद शिंन्दे व एस टी महामंडळाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top